'धुमधडाका'मधील 'प्रियत्तमा' हालाखीच्या स्थितीत, अभिनेत्री ऐश्वर्या राणे यांच्याशी बातचीत
Continues below advertisement
धुमधडाका फेम अभिनेत्री ऐश्वर्या राणे यांना आता ‘अ’ श्रेणीनुसार मानधन देण्यात येणार आहे. माझाने शनिवारी अभिनेत्री ऐश्वर्या राणे यांची व्यथा मांडली होती. त्यानंतर राणे यांच्या प्रस्तावाचा फेरआढावा घेत त्यांना अ श्रेणीचं मानधन देण्यात येणार आहे.
कलाकार आणि साहित्यिकांसाठी सरकार मानधन देतं. अ श्रेणीसाठी पात्र असूनही त्यांना मार्च 2015 पासून क श्रेणीचं 1500 रुपयांचं मानधन देण्यात येत होतं. त्यामुळे ऐश्वर्या राणे यांना अ श्रेणीनुसार 2100 रुपये मानधन मिळणार आहे.
राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत हे मानधन दरमहा कलाकार, साहित्यिकांना देण्यात येतं. यासाठी राज्य सरकारची विशेष समिती पात्र कलाकार आणि साहित्यिकांची निवड करते.