Assembly Election | भाजपच्या धनंजय महाडिकांचं राष्ट्रवादीला मत देण्याचं आव्हान! | ABP Majha
नेत्यांच्या एवढ्या राजकीय बेडूकउड्या सुरू आहेत की त्यांना आपण कोणत्या पक्षात आहोत याचं देखील भान राहिलेलं नाही. याचा प्रत्यय कोल्हापुरात महाडिकांच्या सभेत आला. धनंजय महाडिकांनी चक्क राष्ट्रवादीला मत द्या असं आवाहन केलं. चूक लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर सारवासारव करण्याची वेळ आली