सिंधुदुर्ग : दक्षिण कोकणची काशी 'कुणकेश्वर'च्या यात्रेला सुरुवात
महाशिवरात्रीनंतर तिन दिवस ही यात्रा चालते. कुणकेश्वर गावाच्या समुद्र किनारी वसलेले हे मंदिर पांडवकालीन तसेच शिवकालीन इतिहासाचं साक्षीदार असल्याचं मानलं जातं. दक्षिण कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या कुणकेश्वरला महाशिवरात्रीपासून पुढील तीन दिवस भक्तांची गर्दी पहायला मिळते. या मंदिराला जिल्ह्यातील नव्हे तर देश विदेशातील पर्यटकहि भेट देतात. काशीमध्ये 108 शिवलिंग आहेत तर कुणकेश्वेर मध्ये 107 शिवलिंगं आहेत. त्यामुळेच कुणकेश्वरला कोकणातली काशी बोललं जातं. मात्र ही शिवलिंगे समुदाच्या काठावर असल्यामुळे हि ओहोटीच्या वेळीच पाहायला मिळतात. या शिवलिंगांवर समुद्रातील लाटा ह्या बारा महिने आदळत असतात पण तरिही हे शिवलिंग झिजले नाही. जवळपास 350 वर्षापुर्वी शिवाजी महाराजांनी या मंदिरात येऊन कुणकेश्वराचं दर्शन घेतल्याचं बोललं जातं. भक्तीभावाने हजारोंच्या संख्येने भाविक इथे येतातच. पण इथला नयनरम्य निळाशार समुद्र, स्वच्छ किनारा आणि झाडांची हिरवळ प्रत्येकाचं मन मोहून टाकते.