मुंबई : हापूस देवगडचा की रत्नागिरीचा? पेटंट कार्यालय म्हणतं...
हापूस नक्की कुणाचा? देवगडचा की रत्नागिरीचा? या प्रश्नाचं उत्तर आहे अख्ख्या कोकणाचा... मुंबईतल्या पेटंट कार्यालयात झालेल्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला. या निर्णयामुळे देवगड आणि रत्नागिरीची निराशा झाली असली, तरी दोन्ही आंबा उत्पादकांनी हा निर्णय मान्य केला.