नवी दिल्ली : जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत कोणत्या वस्तू कक्षेबाहेर? कशामध्ये कपात?
Continues below advertisement
सॅनिटरी नॅपकिन जीएसटीच्या कक्षेतून काढून टाकण्यात आले असून, वॉशिंग मशीन, फ्रिज, दागिन्यांचे बॉक्स इत्यादी अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत. जीएसटी कौन्सिलने आजच्या बैठकीत 28 टक्के जीएसटी गटात असणाऱ्या अनेक वस्तूंवरील कर कमी करण्यात आला. दरम्यान जीएसटी कौन्सिलची पुढील बैठक 4 ऑगस्टला केरळमध्ये होणार आहे. त्या बैठकीत अजून काय महत्वाचे निर्णय होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत ज्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आलं आहे, त्यांची अंमलबजावणी 27 जुलैपासून सुरु केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी दिली.
Continues below advertisement