नवी दिल्ली : नाराज असलेल्या चारही न्यायमूर्तींना सरन्यायाधीश भेटणार

Continues below advertisement

चार न्यायमूर्ती आणि सरन्यायाधीश यांच्यातील वाद मिटविण्याचे प्रयत्न सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी नाराज न्यायमूर्तींना भेटण्यासाठी बोलावलं आहे. त्यामुळे दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती जे चेलमेश्वर, कुरियन जोसेफ, रंजन गोगोई,  आणि न्यायमूर्ती मदन लोकूर पुन्हा एकदा सरन्यायाधीशांना भेटण्याची शक्यता आहे. आज तरी या वादावर पडदा पडतो का हे पाहणं महत्वाचं आहे. सरन्यायाधीश आणि चार न्यायमूर्ती यांच्यात खटल्याच्या वाटपावरुन मतभेद झाले होते. त्यानंतर 12 जानेवारीला जाहीर पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीशांबद्दल नाराजी व्यक्त केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram