नवी दिल्ली : त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये कोण बाजी मारणार?
Continues below advertisement
ईशान्य भारतात कोणता पक्ष झेंडा फडकवणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे. कारण, त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड इथल्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्रिपुरात भाजपनं पहिल्यांदाच खातं उघडून डाव्यांना कडवी टक्कर दिली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांमध्ये भाजप डाव्यांच्या तुलनेत पुढे आहे. तर मेघालयात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत दिसत आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने ही राज्यं छोटी असली तरी, या तिन्ही राज्यांचा निकाल आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं मोठी उभारी देणारा ठरणार आहेत. त्रिपुरात मागच्या दीड दशकापासून डाव्यांची सत्ता आहे. मात्र, यंदा याठिकाणी भाजप डाव्यांच्या गडावर कब्जा करणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.
Continues below advertisement