नवी दिल्ली : भाजपला आणखी एक झटका, चंद्राबाबूंचा एनडीएलाही रामराम, शिवसेना तटस्थ
केंद्र सरकारमधून बाहेर पडल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाने आता भाजपचं नेतृत्त्व असलेल्या एनडीएलाही रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. तेलगू देसम पार्टीच्या पॉलिट ब्यूरोची बैठक पार पडली. त्यानंतर चंद्राबाबूंनी नवी दिल्लीत आपल्या खासदारांशी संपर्क साधून तशा सूचना दिल्या आहेत. पक्षाकडून लवकरच याबाबतची औपचारिक घोषणा केली जाणार आहे.