नवी दिल्ली : कर चुकवेगिरी करणाऱ्यांकडून तब्बल 26 हजार पाचशे कोटी वसूल
Continues below advertisement
टॅक्स रिटर्न्स फाईल न करणाऱ्यांभोवती आयकर विभागानं दोर आवळल्यानंतर तब्बल 26 हजार 500 कोटी रुपयांची वसुली झाल्याचं समोर आलं. काल अरुण जेटली यांनी सदनात ही माहिती दिली आहे. नोटाबंदीनंतर मोठ्या रकमेची ट्रान्झॅक्शन करणाऱ्यांवर सरकारची नजर होती. अशा जवळपास कोटी 7 लाख लोकांना आयकर विभागानं नजर ठेवून त्यांच्याकडून 26 हजार कोटी वसूल केलेत. मोठ्या रकमेचे व्यवहार करुनही वर्षानुवर्ष आयकर न भरणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी सरकरानं टीडीएस आणि टीसीएसची मदत घेतली. तसंच यापुढे अशा पद्धतीनं कर भरणं टाळणाऱ्यांना सूट मिळू नये यासाठी 2 लाखांवरील व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्यात आल्याचं जेटली म्हणाले.
Continues below advertisement