नवी दिल्ली : मोदींकडे पुरेसं संख्याबळ नाही, सोनिया गांधींच्या विधानाने भाजपात खळबळ
Continues below advertisement
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या एका विधानानं भाजपमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. आज लोकसभेत विरोधकांनी मोदी सरकारविरोधात दाखल केलेल्या अविश्वास ठराव स्वीकारण्यात आला. मात्र, मतदानावेळी हा प्रस्ताव किती टिकेल असा सवाल विचारला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारल्यावर कोण म्हणतं आमच्याकडे संख्याबळ नाही, असा उलटप्रश्न सोनिया यांनी विचारला. सोनिया यांच्या या विधानानं भाजपमध्ये खळबळ माजल्याचं बोललं जात आहे.
Continues below advertisement