दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा

Continues below advertisement
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं उपराज्यपालांच्या कार्यालयाबाहेर सुरु असलेल्या उपोषणाला चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनतर आता शिवसेनेनंही पाठिंबा दिला आहे. ज्या सरकारला लोकांनी प्रचंड बहुमतांनी निवडून दिलं, त्यांना त्यांच्या पद्धतीने राज्य कारभार करण्याचा अधिकार मिळायला हवा, असं संजय राऊत यांनी म्हटलं. चार महिन्यांपूर्वी दिल्लीच्या सचिवालयात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांवर मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दिल्लीच्या आयएएस अधिकाऱ्यांनी सरकारशी असहकार पुकारला. त्यांनी केलेल्या कामबंद आंदोलनामुळे दिल्लीचं कामकाज ठप्प झालं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram