नवी दिल्ली : दिल्लीत शिवजयंतीचा जंगी कार्यक्रम, राजपथावरही मिरवणूक
Continues below advertisement
आपल्या शौर्यानं अवघ्या जगाला भुरळ घालणाऱ्या आणि मोघल साम्राज्याला कापरं भरायला लावणाऱ्या शिवाजी महाराजांच्या जयंतीचा जंगी कार्यक्रम आज दिल्लीत होतोय.
त्यासाठी देशभरातून हजारो शिवभक्त नवी दिल्लीत दाखल झाले आहेत.
अवघ्या तासाभरात महाराष्ट्र सदनातून शिवजन्मोत्सव सोहळा आणि शाहिरी कार्यक्रमानं शिवजयंती कार्यक्रमाची सुरुवात होईल.
शिवजयंतीचं औचित्य साधून राजपथावरुन भव्य मिरवणूक निघेल. ज्यात हत्ती, घोडे आणि उंटही पाहायला मिळतील. शिवजयंती हा राष्ट्रीय उत्सव बनावा ही त्यामागची मुख्य संकल्पना आहे.
या कार्यक्रमाला खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची हजेरी असणार आहे.