VIDEO | नायडूंच्या मंचावर मोदी विरोधक एकवटले | नवी दिल्ली | एबीपी माझा
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आज दिल्लीत एकदिवसीय उपोषण केलं. आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा आणि राज्य पुर्नगठन अधिनियम, 2014 नूसार दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याच्या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आलं. यावेळी चंद्राबाबू यांच्या मंचावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक विरोधक एकत्र आले.