नवी दिल्ली : राज्यसभेतील कोणत्या खासदारांचा कार्यकाळ संपला?

Continues below advertisement
राज्यसभेच्या निवडणुकांची काल घोषणा झालीय. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. तर
१६ राज्यातील एकूण ५८ जागांसाठी २३ मार्चला मतदान होणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात कार्यकाळ संपत असलेल्या राज्यसभेच्या जागांसाठी ही निवडणूक होतेय. यात उत्तरप्रदेशातील सर्वाधिक १० तर महाराष्ट्रातील ६ जागांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार अनिल देसाई निवृत्त होत आहेत. पण देसाईंना शिवसेनेकडून पुन्हा एकदा संधी देण्यात आलीय. उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केलीय. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 12 मार्च आहे. शिवसेनेचं नाव निश्चित झाल्यानंतर आता भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुणाला संधी देतं हे पाहणं महत्वाचं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram