नवी दिल्ली | शेतकऱ्यांचा एल्गार, खासदार राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया
गांधी जयंती आणि जय जवान जय किसानचा नारा देणारे देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत एल्गार पुकारला. भारतीय किसान युनियनची किसान क्रांती यात्रा दिल्लीत दाखल झाली. मात्र पोलिसांनी त्यांना दिल्लीच्या सीमेवर रोखल्याने, पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री झाली. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी आधी पाण्याचे फवारे मारले, त्यानंतर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.