ABP News

नवी दिल्ली : अटल बिहारी वाजपेयींना पाहण्यासाठी राहुल गांधी एम्समध्ये

Continues below advertisement
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नियमित तपासणीसाठी वाजपेयी यांना दिल्लीतील ‘एम्स’मध्ये दाखल केले आहे.

एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली अटल बिहारी वाजपेयी यांची तपासणी केली जाईल, अशी माहिती भाजपने दिली. वाजपेयींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तातडीने भाजपने पत्रक काढून त्यासंदर्भात माहिती दिली.

अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे माजी पंतप्रधान आहेत. राजकीय आणि सरकारमधील अनेक पदं त्यांनी भूषवली. 93 वर्षीय वाजपेयी हे सध्या राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त असतात.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram