VIDEO | प्रियंका गांधींच्या यशानुसार पुढची जबाबदारी : राहुल गांधी | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
प्रियंका गांधींना फक्त उत्तर प्रदेशपर्यंत मर्यादित न ठेवता त्यांच्यावर राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी दिली जाईल, असं स्पष्टीकरण काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी केलं आहे. हिंदुस्थान टाईम्स या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. अध्यक्ष म्हणून मी एक कामगिरी देतो आणि त्या कामगिरीच्या यशानुसार पुढची जबाबदारी देतो. असंही त्यांनी सांगितलं आहे.