BIGG BOSS 13 | बिग बॉसचा 13 वा सीजन वादाच्या भोवऱ्यात, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे तक्रारी | ABP Majha
बिग बॉसचा तेरावा सिझन अनेक कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. या शोमध्ये मेल आणि फीमेल स्पर्धकांना एकच बेड शेअर करण्यास सांगण्यात आलंय. हा बदल प्रेक्षकांना खुपल्यानं याबाबतच्या अनेक तक्रारी थेट केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडेही पोहोचल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत सरकारने 'बिग बॉस १३'मध्ये नेमकं काय चाललंय? याची तपासणी सुरू केल्याचे सांगण्यात येत होतं. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या स्पष्टीकरणानंतर त्यावर शिक्कामोर्तब झालंय.