नवी दिल्ली : किसान मोर्चातून माओवाद डोकावतोय का? खासदार पूनम महाजनांची मुक्ताफळं
Continues below advertisement
तब्बल 200 किलोमीटर पायी चालत येऊन आपल्या न्याय्य हक्कांसाठी भांडणाऱ्या शेतकऱ्यांना आता माओवादाचं लेबल भाजप खासदारानं लावलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न योग्यच आहेत, मात्र यानिमित्तानं आंदोलनातून शहरी माओवाद डोकावतो आहे का? हे पाहावं लागेल, अशी मुक्ताफळं उत्तरमध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांनी उधळली आहेत.
सुमारे 200 किलोमीटरचा रस्ता उन्हातान्हातून पायी कापत शेतकरी नाशिकहून मुंबईत पोहोचले आहेत. आपल्या न्याय्य हक्कांसाठी शेतकऱ्यांनी पायातून येणाऱ्या रक्ताची पर्वा केली नाही. अशा स्थिती लोकांना सहानुभूती देत, आधार देण्याऐवजी सत्ताधारी पक्षातील खासदारच माओवादाचं लेबल लावून शेतकऱ्यांची हेटाळणी करताना दिसत आहे.
खासदार पूनम महाजन यांच्या वक्तव्याचा आता सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.