नवी दिल्ली : ढोंगी राधे माँला दिल्ली पोलिसांकडून व्हीआयपी ट्रिटमेंट
Continues below advertisement
भोंदू बाबांच्या यादीत वरच्या स्थानावर असलेल्या राधे माँला दिल्ली पोलिसांनी व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचं समोर आलं आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात राधे माँ दिल्लीच्या विवेक विहार पोलीस ठाण्यात आली होती. यावेळी एसएचओ संजय शर्मांनी चक्क तिला आपली खुर्ची बसायला दिली. इतकंच नव्हे तर राधे माँचा आशीर्वाद घेतला. राधे माँने प्रसाद म्हणून संजय शर्मांच्या गळ्यात ओढणीही टाकली. ही सगळी दृश्यं व्हायरल झाल्यानंतर आता स्पष्टीकरण देताना दिल्ली पोलिसांना कसरत करावी लागत आहे.
Continues below advertisement