नवी दिल्ली: मोदींना 63% पसंती, पुन्हा भाजप सरकार, सी व्होटर सर्व्हे

Continues below advertisement
मोदी सरकारला साडेतीन वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही देशात मोदींचा करिष्मा कायम आहे. सी व्होटरनं केलेल्या सर्वेनुसार आता निवडणुका झाल्या तर पुन्हा एकदा मोदींची सत्ता येऊ शकते. पंतप्रधानपदासाठी 63 टक्के लोकांनी मोदींना पसंती दिलीय. तर फक्त 13 टक्के लोकांनी राहुल गांधींना साथ दिली आहे.
त्यामुळे सध्या तरी देशात मोदींची जादू दिसतेय. खरं तर गुजरात निवडणुकीनंतर काँग्रेसला अच्छे दिन येतील अशी अपेक्षा होती. मात्र काँग्रेसला फारसं यश मिळतांना दिसत नाही. सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेनुसार काँग्रेसला फक्त 60 जागा मिळू शकतील. गेल्या निवडणुकीच्या काँग्रेसला 40 जागा मिळाल्या होत्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram