
मुंबई : उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा
Continues below advertisement
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 58 वा वाढदिवस आहे. मात्र माझ्या वाढदिवसानिमित्त फलक, होर्डिंग्ज लावू नका, मुंबईचं पर्यावरण जपा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातील शिवसैनिक 'मातोश्री' निवासस्थानावर दाखल होत आहेत. शिवसेनेच्या वतीने आज विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही उद्धव ठाकरे यांना ट्वीट करुन शुभेच्छा दिल्या आहे.
Continues below advertisement