नवी दिल्ली : भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान मोदी वाजपेयींच्या भेटीसाठी एम्समध्ये दाखल
दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल असलेले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भेटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहचलेत...दरम्यान, मोदींच्या भेटीपुर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही वाजपेयी यांची भेट घेतली. तसेच भाजप अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह, जेपी नड्डा, विजय गोयल आणि मुख्तार अब्बास नक्वी यांनीही वाजपेयींची भेट घेत तब्येतीची विचारपूसही केलं.