नवी दिल्ली : लोकसभेत पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर 10 आरोप
Continues below advertisement
अर्थसंकल्पीय अधिवेशनात नरेंद्र मोदींना आज जोरदार विरोधाचा सामना करावा लागला. तब्बल दीड तास मोदी भाषण करत होते. त्यावेळी विरोधकांचीही घोषणाबाजी सुरु होती. फक्त काँग्रेसच नाही तर एनडीएमध्ये घटकपक्ष असलेल्या तेलगू देशम पार्टीच्या सदस्यांनीही जोरदार घोषणाबाजी केलीय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठराव नरेंद्र मोदींनी लोकसभेत मांडला. मोदींचे भाषण सुरु होताच तेलगू देसम पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत घोषणाबाजी केली. अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशसाठी विशेष तरतूद नसल्यानं तेलगू देसमचे खासदार आक्रमक झाले. घोषणाबाजी थांबत नसल्याने शेवटी नरेंद्र मोदींनी या गोंधळातच भाषण केलं. यावेळी मोदींनी काँग्रेसच्या कार्यकाळावर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
Continues below advertisement