नवी दिल्ली : देशाच्या हिताचे अनेक विधेयकं यावेळी मंजूर करु - मोदी

Continues below advertisement
आजपासून दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात एकूण 46 विधेयकांवर चर्चा होणार आहे. सरकार म्हणून आम्ही प्रत्येक मुद्द्यावर चर्चेस तयार आहोत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. विरोधकही सहकार्याची भावना ठेऊन संसदेच्या वेळेचा योग्य वापर करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.  ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे, आणि ज्या भागात अद्याप पाऊस पडलेला नाही, त्याबाबत संसदेत चर्चा व्हावी, असं मोदी म्हणाले आहेत. दरम्यान, अफवा पसरवून होणाऱ्या हिंसक घटना, गुंतवणूक आणि रोजगाराचा प्रश्न, जम्मू-काश्मीरमधील हिंसाचार यासह इतर अनेक मुद्दे या अधिवेशनात महत्वाचे ठरणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram