P Chidambaram Arrest Update | माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक, थोड्याच वेळात पुन्हा चोकशी सुरु होणार | ABP Majha
Continues below advertisement
जवळपास 28 तासांच्या लपंडावानंतर देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयनं अटक केलीय. आयएनएक्स मीडियाप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं जामीन फेटाळल्यानंतर गायब झालेले चिदंबरम काल दिल्ली काँग्रेस कार्यालयात अवतरले. काँग्रेसची पत्रकार परिषद, त्यानंतर झालेला ड्रामा, या सगळ्यानंतर सीबीआयनं त्यांना अटक केली. अटक केल्यानंतर आरएमएल हॉस्पिटलमध्ये चिदंबरम यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आज चिदंबरम यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आणि सीबीआय 14 दिवसांची कोठडी मागणार असल्याची माहिती मिळतेय. सीबीआय आणि ईडीकडून चिदंबरम यांची एकत्र चौकशी केली जाऊ शकते.
Continues below advertisement