नवी दिल्ली : विरोधकांची शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक

मोदी सरकारविरोधात नवी दिल्लीत शरद पवारांच्या घरी विरोधकांची बैठक झाली. या बैठकीत फक्त काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डावे नेते उपस्थित होते तर तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दला, बहुजन समाजवादी पक्ष आणि डीएमके यांनी मात्र पाठ फिरवली. त्यामुळे विरोधकांमध्ये पुन्हा एकदा फूट दिसली. सरकारविरोधात पुढील दिशा काय ठरवायची यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय. आता विरोधकांची पुढील बैठक सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेत पुढील आठवड्यात होणार आहे. तर दुसरीकडे एनडीएची ही बैठक पार पडली. यात एक देश एक निवडणूक या विषयवार चर्चा झाल्याचं समजतंय. या बैठकीला शिवसेनेचे नेतेही उपस्थित होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola