नवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळला आहे. त्यामुळे विरोधकांना मोठा झटका बसला आहे. व्यंकय्या नायडू यांनी 20 पानांच्या आदेशात महाभियोग प्रस्ताव फेटाळण्याच्या कारणांचा उल्लेख केला आहे. यात एक तांत्रिक कारण देण्यात आलं आहे. सात निवृत्त खासदारांनीही महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी केली असून ते कायदेशीररित्या चुकीचं आहे, असं सांगण्यात आलं आहे. सीबीआय न्यायाधीश बी.एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर विरोधक आक्रमक झाले होते. त्यामुळे काँग्रेससह अन्य विरोधीपक्षांनी शुक्रवारी महाभियोग प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावावर काँग्रेसह 71 खासदारांनी स्वाक्षरी केली होती. यात काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, बसपा आणि मुस्लीम लीग या पक्षांचा समावेश होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ माजिद मेनन यांची प्रतिक्रिया...
Continues below advertisement