नवी दिल्ली : नारायण राणेंना मंत्रिपदाऐवजी खासदारकी मिळण्याची शक्यता

Continues below advertisement
दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्यानंतर आता नारायण राणेंसमोर भाजप नवा प्रस्ताव ठेवण्याची शक्यता आहे. नारायण राणेंना आता मंत्रीपदाऐवजी आता राज्यसभेत खासदारकी मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. नारायण राणेंना खासदारकी आणि नितेश राणेंना भविष्यात राज्यात काही स्थान यावर तडजोड झाल्याची शक्यता आहे. काल नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांसह अमित शहांची भेट घेतली. त्यातून हा फॉर्म्युला पुढे आलाय. अर्थात राणेंना हा फॉर्म्युला मान्य होतो का हे पाहणं महत्वाचं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram