नवी दिल्ली : मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत राणे पिता-पुत्र दिल्ली दरबारी
Continues below advertisement
काँग्रेसला रामराम ठोकून स्वतंत्र चूल मांडणारे नारायण राणे यांचा बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळातील प्रवेश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण काल नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांसह अमित शहांची भेट घेतली. दिल्लीमध्ये काल भाजपशासित मुख्यमंत्र्यांची बैठक होती. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. त्यावेळी त्यांनी अमित शहांची भेट घेतलीय. या बैठकीत राणेंच्या मंत्रिमंडळप्रवेशा संदर्भात चर्चा झाली असेल का? असे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लावले जातायत. त्यामुळे दिल्लीतल्या या घडामोडींनंतर नारायण राणेंची मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? हे पाहणं महत्वाचं आहे.
Continues below advertisement