नवी दिल्ली : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी अखेर बदलले, मल्लिकार्जुन खर्गेंकडे धुरा
Continues below advertisement
2019 च्या निवडणुकांना सामोरं जाण्याआधी काँग्रेसने अखेर महाराष्ट्र प्रभारी बदलले आहेत. मोहन प्रकाश यांच्याऐवजी आता लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. निवडणुकीच्या वर्षातच हा महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.
Continues below advertisement