नवी दिल्ली : अण्णांच्या मनधरणीचे प्रयत्न, महाराष्ट्र सरकारचं शिष्ठमंडळ दिल्लीकडे रवाना
Continues below advertisement
अण्णांच्या मनधरणीसाठी सरकारचं शिष्टमंडळ प्रस्ताव घेऊन अण्णांकडे जाणार आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावर पाच दिवसांपासून सुरु असलेल्या अण्णांच्या आंदोलनावर अद्यापही तोडगा निघत नाही आहे. तर दुसरीकंडे उपोषणामुळे अण्णांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. या प्रस्तावानंतर अण्णा आठ वाजेच्या सुमारास आपल्या उपोषणाबाबत पुढचा निर्णय घेणार आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीला निघाल्याची माहिती खुद्द अण्णांनी दिली आहे.
Continues below advertisement