नवी दिल्ली : राजधानीत महाराष्ट्राचा डंका, शिवराज्याभिषेकाचा चित्ररथ देशात अव्वल
Continues below advertisement
यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला आहे. संरक्षणमंत्री निर्मला सितारमन यांच्या हस्ते महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचं पहिलं पारितोषिक देण्यात आलं.
प्रजासत्ताक दिनी राजपथावर विविध राज्यांचे तसेच दूरदर्शन, सैन्यदलासह विविध खात्यांचे चित्ररथ साकारण्यात आले होते. महाराष्ट्राने यावर्षी शिवराज्याभिषेकाचा चित्ररथ साकारला होता. तर आसामने स्थानिक लोककलांवर आधारित चित्ररथ साकारला होता. छत्तीसगडच्या चित्ररथानेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
दरम्यान, यापूर्वीही 2015 साली महाराष्ट्राच्या चित्ररथाने पहिलं पारितोषिक मिळवलं होतं. महाराष्ट्राचं वैभव देशालाच नव्हे तर जगाला सांगणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा या चित्ररथाचा पहिलं पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.