नवी दिल्ली : अविश्वास ठरावावर रामदास आठवलेंची चारोळ्यांतून फटकेबाजी

केंद्रातील मोदी सरकारविरोधात संसदेत आज अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. सरकारकडून विजयाचा दावा केला जात आहे, तर अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारविरोधातला रोष विरोधक जनतेसमोर आणणार आहेत. अविश्वास प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सर्व खासदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलगू देसम आक्रमक झाला आहे. भाजपविरोधात तेलुगु देसमनं अविश्वास प्रस्ताव आणलाय. याला काँग्रेससह बहुतोक सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. लोकसभेत भाजपचं बहुमत अगदी काठावरचं आहे. त्यामुळं भाजप बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola