नवी दिल्ली : जस्टीस लोया मृत्यू प्रकरणाची सुनावणी 8 दिवस लांबणीवर

Continues below advertisement
जस्टीस बी एच लोया मृत्यू प्रकरणाची सुनावणी एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आलीय.
गुजरातमधील गाजलेल्या सोहराबुद्दीन एनकाऊंटर केसची सुनावणी करणाऱ्या लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाला. ते सीबीआय कोर्टाचे न्यायमूर्ती होते.
याप्रकरणी काँग्रेस समर्थक तहसीन पूनावाला आणि पत्रकार बंधुराज लोणे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. आज त्यावर सुनावणी सुरु झालीय. लोया प्रकरणी सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारने बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील हरीश साळवेंना नियुक्त केलंय..महाराष्ट्र सरकारनं याप्रकरणाची तपास रिपोर्ट कोर्टात सादर केला. त्यानंतर याचिकाकर्त्यांना हा रिपोर्ट देण्याचे आदेश कोर्टानं दिले. आणि एका आठवड्यासाठी ही सुनवणी तहकूब करण्यात आलीय.
लोया यांच्या कुटुंबियांनी मात्र याप्रकरणी कुणावरही संशय नसल्याचं जाहीर केलंय.
त्यामुळे सुप्रीम कोर्टात आज काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram