नवी दिल्ली : माझ्यावरील गुन्हा हा दलितांचा अपमान, जिग्नेश मेवाणीची 9 जानेवारीला हुंकार रॅली

Continues below advertisement

स्वत:ला दलितांचे नेते म्हणवणारे पंतप्रधान कोरेगाव भीमाच्या हिंसाचारावर का बोलत नाहीत? असा सवाल गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी केलाय.
ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. आपल्यावर बिनबुडाचे आरोप करुन गुन्हे दाखल करणं हा दलितांचा अपमान आहे. आपण कुठलंही भडकाऊ भाषण केलं नाही. कोरेगाव-भीमाला भेट दिली नाही. बंदमध्ये सहभागी झालो नाही. तरीही गुन्हा दाखल करण्याचं कारण काय? असा प्रश्नही मेवानींनी विचारला.
यावेळी त्यांनी नवी दिल्लीत 9 जानेवारीला युवा हुंकार रॅली काढण्याची घोषणा केलीय. तसंच रॅली संपल्यानंतर मनुस्मृती आणि संविधान घेऊन पंतप्रधान कार्यालयात जाणार आहोत, मोदींनी एकाची निवड करावी, असं आवाहन मेवानींनी केलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram