नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना दिल्ली हायकोर्टाची नोटीस
Continues below advertisement
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना हिंदूंच्या भावना दुखावल्या प्रकरणी दिल्ली हायकोर्टानं नोटीस बजावली आहे. ‘द टर्बुलेंट इयर्स १९८०-१९९६’ या त्यांच्या पुस्तकात प्रणव मुखर्जी यांनी रामजन्मभूमीबाबत जो उल्लेख केला आहे. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या असल्यानं मुखर्जींना ही नोटीस बजावल्याचंही कोर्टाने म्हटलंय. या प्रकरणी उत्तर देण्यासाठी मुखर्जी आणि पुस्तक छापणाऱ्या रुपा पब्लिकेशनला ६ आठवड्यांची मुदत दिली आहे. मुखर्जी यांच्या या पुस्तकासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते यु. सी. पांडे यांनी एक याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० जुलैला होणार आहे.
Continues below advertisement