नवी दिल्ली : काश्मीरबाबत केंद्राची भूमिका कायम कणखर राहील, हंसराज अहिर यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा राजकीय भूकंप झालाय. कारण भाजप सरकारमधून बाहेर पडल्यानंतर आता जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील पीडीपी-भाजप युतीचं सरकार कोसळलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आता राज्यपाल राजवट लागू होण्याची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद, हिंसाचार वाढला असून, काश्मीर खोऱ्यातील नागरिकांचे मुलभूत अधिकार धोक्यात असल्याचं कारण देत भाजपनं पीडीपीचा पाठिंबा काढला. तशी घोषणा भाजपचे नेते राम माधव यांनी केली. आज दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत भाजप नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर पीडीपी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. रमजान महिन्याच्या काळात राज्यात लागू केलेली शस्त्रसंधी रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यानंतर भाजप आणि पिडीपीमधील तणाव कमालीचा वाढला होता. तसंच द रायझिंग काश्मीरचे संपादर शुजात बुखारी यांच्या हत्येच्या मुद्द्यावरुनही भाजप आणि पीडीपीत मतभेद झाले होते.