नवी दिल्ली : देशाचा जीडीपी 7.1 वरुन 6.5 वर जाण्याची शक्यता, सांख्यिकी विभागाचा अंदाज

Continues below advertisement
नोटबंदी, जीएसटीच्या निर्णय़ानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण 2017-18 या आर्थिक वर्षात एकूण देशांतर्गत उत्पन्न वाढीचा अर्थात जीडीपीचा दर घटण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सरकारच्याच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं हा अंदाज वर्तवला आहे. सरकार अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत असताना हा अंदाज महत्वाचा आहे. कारखानदारी आणि कृषी या अर्थव्यवस्थेच्या दोन्ही आधारस्तंभांनी निराशाजनक कामगिरी आहे. त्यामुळे हा परिणाम दिसतो आहे. या अहवालानुसार २०१७-१८च्या जीडीपी वाढीचा दर ६.५ टक्के राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या ७.१ टक्क्यांपेक्षा हा दर खूपच कमी आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram