Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
खेळ माझा : अंडर-17 विश्वचषकातील महाराष्ट्रीय खेळाडू अनिकेत जाधवच्या कुटुंबियांशी बातचित
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
क्रिकेटच्या प्रेमात आकंठ बुडालेला आपला भारत आज फुटबॉलक्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. निमित्त आहे सतरा वर्षांखालील वयोगटाच्या फिफा विश्वचषकाचं. नवी दिल्ली आणि नवी मुंबईच्या स्टेडियमवरच्या सामन्यांनी या विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. आणि आता साऱ्याचं देशाचं लक्ष लागलं आहे ते नवी दिल्लीतल्या भारत विरुद्ध अमेरिका सामन्याकडे. कोल्हापूरचा अनिकेत जाधव या सामन्यात कशी कामगिरी बजावतो याची साऱ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे. अनिकेतचा खेळ पाहण्यासाठी सारं जाधव कुटुंबीय नवी दिल्लीत दाखल झालं आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचा प्रतिनिधी प्रशांत कदमनं.