नवी दिल्ली : मोदींनी मला दिलेला सल्ला स्वत: अमलात आणावा : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग
Continues below advertisement
कधीकाळी मला जो सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी द्यायचे, त्यांनी आता तो जरा अंमलात आणावा. देशातील महत्वाच्या विषयावर आपलं मौन सोडावं. असं मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या खास मुलाखतीत मोदींच्या मौनावर कोरडे ओढलेत. कठुआमधील 8 वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचारावर, उन्नावमध्ये भाजप आमदाराच्या बलात्कार प्रकरणावर मोदींनी वेळेत बोलणं अपेक्षित होतं. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये योग्य मेसेज गेला असता, असंही मनमोहन सिंग म्हणाले.
Continues below advertisement