नवी दिल्ली: कोळसा घोटाळा : झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा दोषी
यूपीए सरकारच्या काळात गाजलेल्या कोळसा घोटाळाप्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टानं आज (बुधवार) दोषी ठरवलं आहे. मधू कोडा यांच्याशिवाय माजी सचिव एच सी गुप्ता यांच्यासह एकूण चार जणांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यांच्या शिक्षेबाबात उद्या (गुरुवार) कोर्टात युक्तीवाद होणार आहे.