नवी दिल्ली : काँग्रेस जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीला पाठिंबा देणार नाही, काँग्रेसची भूमिका
Continues below advertisement
भाजप आणि पीडीपी सरकारनं जम्मू-काश्मीरला बरबाद केल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी केलाय. केंद्र सरकारनं आपली चूक मान्य केल्याचा आनंद असल्याची बोचरी टीकाही आझाद यांनी केलीय. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या सत्तेत दहशतवाद सपुष्टात आला होता. तर भाजप आणि पीडीपीच्या काळात सर्वात जास्त शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. त्यात अनेक जवान शहीद झाले, तर अनेक नागरिकांचा बळी गेल्याचंही आझाद यांनी म्हटलंय.
Continues below advertisement