नवी दिल्ली : नितेश राणे भाजप अध्यक्षांना भेटल्यानं काँग्रेस आमदारांची कारवाईची मागणी

Continues below advertisement
नितेश राणे थेट भाजपाध्यक्षांना भेटल्यामुळे काँग्रेस पक्षातही नाराजी आहे. यापूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुकीला नितेश राणेंनी भाजपला मतदान केलं. त्यामुळे नितेश राणेंवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं करण्यात येत आहे. अर्थात राणेंच्या विरोधात थेट बोलायला एकही काँग्रेसचा आमदार तयार नाही हे विशेष. दुसरीकडे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीकडून नितेश राणेंवर कारवाई केली जात नाही. नितेश राणेंचं हे वागणं खपवून घेण्यामागे विरोधी पक्षनेतेपद असू शकतं. कारण नितेश राणेंची काँग्रेसमधून हकालपट्टी केली, तर विधानसभेतील काँग्रेसचं संख्याबळ कमी होईल. आणि विधानसभेतलं विरोधी पक्षनेतेपद गमवावं लागू शकतं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram