नवी दिल्ली : अमित शाह, मुख्यमंत्री फडणवीस आणि नारायण राणेंमध्ये बैठक
Continues below advertisement
अमित शाहांच्या दिल्लीमधल्या घरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि नारायण राणे यांच्यात एक तास चर्चा झाली. काल रात्री उशिरा ही चर्चा झाली. एवढंच नव्हे तर, बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि नारायण राणे हे एकाच गाडीतून अमित शाहांच्या घरामधून बाहेर पडले. या बैठकीला नितेश राणे हे देखील उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत राणेंच्या मंत्रिमंडळप्रवेशा संदर्भात चर्चा झाली असेल का? असे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहेत. त्यामुळे दिल्लीतल्या या घडामोडींनंतर नारायण राणेंची मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? हे पाहणं महत्वाचं आहे.
Continues below advertisement