नवी दिल्ली : सरकारविरोधात टीडीपीचा अविश्वास ठराव, शिवसेना तटस्थ, चंद्रकांत खैरेंशी बातचीत

Continues below advertisement
आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या कारणावरुन सरकारमधून बाहेर पडून मोदींना थेट आव्हान देणाऱ्या चंद्राबाबूंनी आता एनडीएलाही रामराम ठोकला आहे. ऐवढंच नाही तर मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची तयारी केलीय. सोमवारी यासंदर्भातला प्रस्ताव येऊ शकतो.
या अविश्वासाला समाजवादी पक्षानं पाठिंबा दिला आहे तर शिवसेनेनं फक्त कोरड्या शुभेच्छा दिल्यात. आणि अविश्वास ठरावावेळी तटस्थ राहू अशी भूमिका घेतलीय.
त्याआधी तेलग देसम पार्टीनं एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा केली. आणि भाजपच्या विरोधात संसद परिसरात तलाक-तलाकच्या घोषणा दिल्यात.
तर तिकडे विशेष दर्जाच्या मुद्द्यावरुन वायएसआर काँग्रेसनं मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची तयारी केलीय.
सध्या टीडीपीचे लोकसभेत 16 आणि राज्यसभेत 6 असे 22 खासदार आहेत.

टीडीपीच्या अविश्वास प्रस्तावावर आम्ही तटस्थ राहू असं शिवसेना खासदार चंद्रकांत खैरैंनी म्हटलंय
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram