नवी दिल्ली: सरकारमधून बाहेर पडलेली टीडीपी आता एनडीएतूनही बाहेर
आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या कारणावरुन सरकारमधून बाहेर पडून मोदींना थेट आव्हान देणाऱ्या चंद्राबाबूंनी आता एनडीएलाही रामराम ठोकला आहे.
थोड्याच वेळापूर्वी तेलगू देसम पार्टीच्या पॉलिटब्यूरोची बैठक पार पडली. त्यानंतर चंद्राबाबूंनी नवी दिल्लीत आपल्या खासदारांशी संपर्क साधून तशा सूचना दिल्यात.
इतकंच नव्हे तर टीडीपीनं पत्र लिहून आपला निर्णय़ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना कळवला आहे.