नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारचा दणका, पीएफ व्याजदरात कपात

Continues below advertisement
सरकारने नोकरदारांना एक झटका दिला आहे. भविष्य निर्वाह निधीचा दर घटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. पूर्वीच्या 8 पूर्णांक 65 टक्क्यांवरुन हे दर 8 पूर्णांक 55 टक्के आणण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे नोकरदारांच्या खिशात कमी पैसा येणार आहे. केंद्रीय कामगारमंत्री बंडारु दत्तात्रय यांनी यापूर्वीचं भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात कपात करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर आज ईपीएफओच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे तुमच्या पगारातून कपात होणाऱ्या पीएफवर कमी व्याजदर मिळणार आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram