नवी दिल्ली : सीबीएसईचा मोठा निर्णय, 10 वी, 12 वीचे फुटलेले पेपर पुन्हा होणार!
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने पेपरफुटीमुळे मोठा निर्णय घेतला आहे. दहावी आणि बारावीचे फुटलेले पेपर पुन्हा घेण्यात येणार आहेत. दहावीचा गणिताचा आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा होणार आहे. त्याबाबतचं वेळापत्रक लवकरच सीबीएसईच्या वेबसाईटवर जाहीर होणार आहे.