नवी दिल्ली : तूरडाळ खरेदीवरुन कॅगचे सरकारवर ताशेरे
Continues below advertisement
तूरडाळ खरेदीवरुन कॅगनं राज्य सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहे. सरकारच्या हलगर्जीपणाच्या भूमिकेमुळं ग्राहकांना चढ्या भावात तूरडाळ खरेदी करावी लागली. शिवाय एनसीडीईएक्सकडून चढ्या दरानं तूरदाळ खरेदी केल्यामुळं सरकारवर 2 कोटींचा अतिरिक्त भार पडल्याचंही कॅगनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. या सगळ्यामध्ये तब्बल 78 लाख रुपयांची डाळ विकली गेली नाही, आणि हा डाळसाठा खराब झाला, असंही या अहवालात म्हणण्यात आलं आहे.
Continues below advertisement